
आपल्या भारतीय परंपरा मध्ये लग्न करायच्या आधी पत्रिका पाहतात च! चंद्र राशी आणि नक्षत्रांचा अभ्यास करून 36 गुणांपैकी किती गुण जुळतात यावर पत्रिका जमली किंवा नाही हे ठरतं. या शिवाय मृत्यू षडाष्टक योग वगैरे होतोय का ते सुद्धा आवर्जून तपासून पाहिलं जातं.
आता जन्म पत्रिका जुळवून पाहावी की नाही यावर सुद्धा 2 वेगवेगळी मतप्रवाह आहेत. खूप छान पत्रिका जमल्यावर सुद्धा घटस्फोट झालाच.. किंवा मग लग्न करताना पत्रिका जुळवून पहिल्याच नाहीत तरीही छान संसार झाला. आता या गोष्टींवर थोडा अधिक अभ्यास केला गेला पाहिजे.
मी माझं मत सांगते. फक्त चंद्र राशींवरून पत्रिका बघून गुण किती जुळतात यावर लग्न ठरवणे अजिबात योग्य नाही. मुलगा आणि मुलगी यांच्या जन्म कुंडलीच स्वतंत्र अभ्यास केला गेला पाहिजे. दोन्हीही पत्रिकेत जातकाच्या वृत्ती कश्या दिसतात ते पाहिलं पाहिजे.
आता मला सांगा.. एखाद्या पुरुषाच्या स्वभावात फारसे धाडस नसेल किंवा त्याला छान संवाद कौशल्य नसेल तर जी मुलगी धडाडीने बोलू शकेल आणि वेळ पडली तर दुर्गेचं रूप घेऊन स्वतःचा संसार सावरू शकेल अश्याच मुलीशी त्याने लग्न केलेलं उत्तम होईल ना?? किंवा एखाद्या मुलीला काटकसर अजिबात कळत नसेल तर ज्या पुरुषाच्या पत्रिकेत पैसे अत्यंत सांभाळून हिशोब करत पैसे वापरणाऱ्या व्यक्तीसोबत तिचा संसार जास्त चांगला होईल की नाही??
दुसरा मुद्दा म्हणजे.. प्रत्येकाला लग्नाकडून काय हवे आहे हे ज्याचे त्यालाच माहीत असते. कुणाच्या भावनिक गरजा जास्त असतात, कुणाच्या शारीरिक, किंवा एखाद्याला आर्थिक सिक्योरिटी सगळ्यात जास्त महत्त्वाची वाटू शकते. मग अश्या वेळी एखाद्याला सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवश्यक आहे आणि ती समोरच्या कुठल्या पत्रिकेत/ व्यक्तीमध्ये दिसते आहे. ते तपासलं तर जगण्यातला अर्धा अधिक स्ट्रगल तर कमीच होईल ना..
हे व्यावहारिक मुद्दे आहेत. मात्र पत्रिका पाहताना ते नक्की लक्षात येतात. फक्त त्यासाठी अभ्यासू ज्योतिषी असायला हवा किंवा लग्नाची चाणाक्ष मध्यस्थ करणार व्यक्ती !

